पाचोड येथून ५५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता..
पाचोड/ पाचोड ता.पैठण येथील कल्याणनगर येथील एक ५५ वर्षीय व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता (दि.५मे) रोजी पाचोड येथील बसस्थानकांतून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
याविषयी अधिक माहीती अशी की,पाचोड येथील बबनराव बेगाजी भोजने( वय५५) हे दि ०५ रोजी सकाळी १०.०० वाजता हे कोणाला काही एक न सांगता नेहमी प्रमाणे घरातुन बसस्टैंडकडे चहा पाणी करण्यासठी गेले होते. त्या दिवशी ते दिवसभर घरी आले नाही. रात्री ०८.०० सुमारास ते घरी आले नाही' म्हणून त्याच शोध घेण्यास सुरुवात केली परंतु त्याचा आमचे नातेवाईक बीड, जालना, अंबड, औरंगाबाद व जवळपासच्या परिसरात शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. त्यांचे वर्णन खालील प्रमाणे नाव व पत्ता- बबनराव बेगाजी भोजने वय ५५ वर्ष, रा. कल्याणूनगर पाचोड, ता. पैठण, जि. औरंगाबद कपडे अंगात पांढरा शर्ट काळी पेंट रंग :- सावळा, वाचा सध्यम उंची १.६९ इंच, चेहरा लांबट, नाक -सरळ, केस काळे, शिक्षण- अशिक्षित, भाषा मराठी, मानसिकदृष्ट्या चांगला असून त्याचा शोध होणेस विनंती आहे. या घटनेची पोलीस ठाणे पाचोड येथे सिसिंग दाखल आहे. कोणालाही आढल्यास आल्यास संपर्क क्र ०२४३१/२२१३३३, सपोनि सुरवसे ९४०४६६३२३४, पोहेकॉ/गव्हाणे ९८५०००६४५८, पोना/ २६५ चव्हाण ८१०८४६५६६६ असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मिसिंग व्यक्तीचा फोटो