Citiy 24news jintur
मो 9623476755
जिंतूर शहरांमध्ये दोनवर्षा नंतर गणेशमूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने मोठे संख्येने मिरवणूक काढण्यात आली गणेश मंडळाच्या वतीने घोषणाबाजी डिजे लावून डान्स गाणे वाजून पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात वाजत-गाजत आज राज्यभरात लाडक्या 'बाप्पा'ला निरोप देण्यात आला. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज सर्वत्रच बाप्पाना निरोप दिला गेला. गणेशमूर्ती विसर्जनाच्या निमित्ताने जिंतूर शहरासह ग्रामीण भागात गणेशभक्तांनी डीजे, बँड बाजासह गणेश विसर्जन मिरवणूक काढली. शहरातील सर्व गणेश मंडळाचे स्वागत साठी नगरपालिका ची कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रतिक्षा विजय माणिकराव भांबळे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि काँग्रेस पक्षाचे प्रतापराव देशमुख मोहसीन खान, बु.धवंन आदी कार्यकर्ते व तसेच भाजप पक्षाचे मुन्ना गोरे यांनी गणेश मंडळाचे अध्यक्षाचे ट्रॉफी देऊन त्यांच्या स्वागत केले. जिंतूर मध्ये शांततेत मिरवणूक होण्यासाठी पोलीस निरीक्षक दिपक दंतुरवार साहेबांनी सर्व पोलीस यंत्रणा जागोजागी तयार बंदोबस्त आयोजित केले होते होमगार्ड, आरसीबी महाराष्ट्र पोलीस मोठे संख्याने उपस्थित होते.
या मिरवणुकीत जिंतूरचे युवक डिजेच्या तालावर मोठ्या संख्येने डोलताना दिसले. संपूर्ण शहर डीजेच्या आवाजाने दनानले होते.