ठिकठिकाणी गणपती बप्पाला निरोप;पोलिसांकडून तगडा बंदोबस्त.
पाचोड(विजय चिडे).आज अनंत चतुर्दशी असल्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला असून आज सकाळी पासून पाचोडसह परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम पहायला मिळाली आहे. पाचोड परिसरातील विविध गावात देखील आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देण्यासाठी आला आहेत. पाचोड पोलिस ठाण्यांच्या हर्दित येणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीन काढून गणपती बप्पाचे पाण्यात विसर्जन करण्यात आले आहे.गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पाचोड पोलीसांकडून कर्मचारी बंदोबस्तावर तैनात करण्यात आलेला होता. विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचूती घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली केली होती.
विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पाचोड पोलिस ठाण्यांचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होतो.