जे.एस.एम. महाविद्यालयात अँटी रॅगिंग आणि विद्यार्थी तक्रार निवारण समितीतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रॅगिंग व तक्रार निवारणाबद्दल जागृती व्हावी याकरिता कार्यशाळेचे आयोजन दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले होते.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील आणि अॅड.दीपक नागे हे प्रमुख वक्ते म्हणून यावेळी हजर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अँटी रॅगिंग समितीचे प्रमुख प्रा. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. सोनाली पाटील यांनी करून दिला. यानंतर प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी रॅगिंग म्हणजे काय, कुठल्या प्रकारची कृती रॅगिंग समजली जाते आणि रॅगिंगमुळे होणारे परिणाम व त्यामुळे विद्यार्थ्यांची बदलणारी मानसिकता व विद्यार्थ्यांचे नुकसान, तसेच महाविद्यालयाची अँटी रॅगिंग समिती व तिचे काम व महत्त्व विशद केले. अँटी रॅगिंग समितीचे प्रमुख काम म्हणजे कुठल्याही प्रकारे रॅगिंग महाविद्यालयात होऊ नये म्हणून प्रयत्न करणे आणि कुठल्याही प्रकारच्या कृत्याविषयी दखल घेणे व त्याबद्दल कारवाई करणे असे त्यांनी सांगितले.

अॅड. नागे यांनी अँटी रॅगिंगची कायदेशीर बाजू समजावून सांगितली. रॅगिंग केल्यास कुठल्या प्रकारची शिक्षा होऊ शकते, सुप्रीम कोर्टाने समिती स्थापनेबद्दल काय दिशानिर्देश दिले आहेत याबद्दल माहिती दिली.

 या कार्यशाळेसाठी १७० विद्यार्थी तसेच प्रा.मेहेंदळे, प्रा.कानडे, प्रा.आचार्य, प्रा.जाधव, प्रा.श्वेता पाटील व समिती सदस्य हजर होते. कार्यशाळेच्या शेवटी प्रा. श्वेता मोकल यांनी उपस्थितांचे आभार मानले.