हर्षीत टाळ मृदंगाच्या गजरात गणपती बाप्पांना निरोप
पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्यातील हर्षी येथे एक गाव एक गणपती असून येथील गणेश मंडळाच्यावतीने आज दि.९ सप्टेंबर रोजी टाळ मृदंगाचा गजर व पुष्पांच्या पाकळ्यांची उधळण करून गणेश विसर्जन करण्यात आले.
हषी येथे या वर्षी गणेश मंडळाच्या वतीने एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली होती.आज विसर्जनाच्या दिवशी मंडळाने डी.जे. बँड व गुलालाची उधळण न करता हरिहरी वारकरी ,धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देत सांप्रदायिक पद्धतीने वारकऱ्यांच्या सुमधुर आवाजात अभंग,गवळण गात टाळ मृदंगाच्या गजरात आणि सुगंधित पुष्प फुलांची उधळण करत,सोबत गावकरी महिलांनी लेझिम खेळत अशा भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन,आणि गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर महिलांनी संपूर्ण गावामध्ये रांगोळीने रस्ते सुशोभित केले होते तर महिलांनी जागोजागी पुष्प फुलांनी श्री गणेशाची पूजा केली.अशा या भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पांना निरोप गावकऱ्यांनी दिला आहे.