पाथरी शहरातुन सेलूकडे जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ बी ची अतीशय दयनिय अवस्था झाली असून या महामार्गावरून जातांना अडथळ्यांची मोठी शर्यत पार करत जिवमुठीत घेत प्रवास करावा लागतो.या अशा महामार्गावरून प्रवास करतांना दर दिवशी ,चारचाकी वाहनांचे अपघात होऊन अनेक प्रवाशी जखमी होण्याच्या घटना नियमीत होत असून वाहनांचे ही मोठे नुकसान होत आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता बोरगव्हाण जवळ या राष्ट्रीय महामार्गावरून मोलॅसीस घेऊन जाणारा टँकर महामार्गा मध्योमध रुतल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. पाथरी-सेलू या प्रस्तावीत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करून नागरीकांची होणारी गैरसोय टाळावी या साठी राकाँच्या वतीने गतमहिण्यात आ बाबाजानी यांच्या नेतृत्वात पाथरी शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांनी येत्या महिणाभरात हा महामार्ग खड्डे बुजऊन तात्पुरता वाहतुक योग्य करण्याचे आश्वासन दिल्या नंतर आ दुर्रानी यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले होते. यानंतर जवळपास महिणा संपला तरी या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था जैसेथे पेक्षाही पावसाने अतीशय वाईट झाली असल्याचा अनुभव प्रवाशी आणि वाहन धारक घेत आहेत. शुक्रवार ९ सप्टेबर रोजी हिंगोली येथून मोलॅसीस घेऊन सेलू मार्गे पाथरी हुन बारामती कडे जाण्या साठी येणारा टॅकर क्र एमएच १२ एचडी २२७३ बोरगव्हाण पासुन पाचशे मीटर अंतर पुढे आल्या नंतर या ठिकाणी महामार्गावर असल्या भल्या मोठ्या खड्यात पाण्याचा अंदाज नआल्याने चक्क रुतून बसला. या वेळी बोरगव्हाण येथील सिद्धेश्वर इंगळे आणि काही ग्रामस्थांनी हा फसलेला टँकर काढण्या साठी प्रयत्न केले पण ते व्यर्थ गेल्याने गावातून ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीन बोलावले तरीही हा रुतलेला टँकर दुपारी एकवाजे पर्यंत काढण्यात ग्रामस्थांना यश आले नाही. महामार्गावर टँकर रुतल्या मुळे याठीकाणा हून होणारी रहदारी ठप्प झाली होती.शिक्षणा साठी येणा-या विद्यार्थ्यांना ही आल्या पावली परत जावे लागले. या पुर्वी असाच प्रकार याच राष्ट्रीय महामार्गावर पाथरी हु सोनपेठ कडे जातांना बाभळगाव जवळ खताचा ट्रक रूतला होता. तर आता पाथरी-सेलू महामार्गावर टँकर रुतून बसला असून बोरगव्हाण येथील ग्रामस्थांनी तहसीलदार यांना या प्रकारा विषयी माहिती दिल्या नंतर ही हे काम आमचे नसल्याचे त्यांनी सांगल्याचे म्हटले जात आहे. याराष्ट्रीय महामार्गाच्या किमान दुरूस्तीचे तरी काम त्वरीत करावे अशी मागणी प्रवाशी आणि धारकां मधून होत आहे.