श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील भीमा नदीच्या घाटावर मेन चौक प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्या वतीने गणेश विसर्जन निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली.

Sponsored

गोविंदम EV स्टेशन बूंदी राजस्थान

गोविंदम EV स्टेशन की ओर से समस्त बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनायें

यावेळी पुणे जिल्हा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर , शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे ,जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जयेश शिंदे,माजी उपसरपंच महेंद्र गवारे, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ,मेन चौक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, प्राध्यापक संदीप गवारे,प्रवीणकुमार जगताप, संतोष गवारे ,सागर ढमढेरे ,वैभव गवारे, प्रमोद गवारे,दिनेश राऊत, पत्रकार के.टी.कोतवाल,तेजस शिंदे, अनिष गवारे, श्यामराव गवारी,घनश्याम गवारी, भिकुतात्या शिंदे ,संतोष गवारे,दीपक शेलार,सागर गायकवाड,मछिंद्र गवारे, सुरज शिंदे, मंगेश गवारे, विनोद सोनवणे,अक्षय भोसले ,अनिल ढवळे, संदीप गवारे ,महादेव पवार,मुकेश चौधरी, तळेगाव ढमढेरे येथील व्यापारी वर्ग, शिक्रापूर पोलीस स्टेशनचा सर्व पोलीस स्टाफ,विठ्ठलवाडीचे ग्रामस्थ,यांच्या सह पुणे शहरासह चंदननगर,तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर,परिसरातील गणेश भक्त गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी पोलीस अधीक्षकांनी बोटींमधून गणपती विसर्जन करण्यास मदत करणाऱ्या स्वयंसेवकांचा सन्मान करून शुभेच्या देताना उपक्रमाचे कौतुक केले.इतर गावातील मंडळांनी या उपक्रमाचा आदर्श घेऊन हा उपक्रम राबवावा असे सांगितले.