परळी ,
येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात गृहशास्त्र विभागाच्या वतीने पोषण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या पोषण सप्ताहाचे उद्घाटन नुकतेच संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय संजय देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.याप्रसंगी बोलताना त्यांनी आपल्या जीवनातील आहाराचे व पोषणाचे महत्त्व विविध उदाहरणांनी स्पष्ट करून सांगितले.यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस.मुंडे यांचीही समायोचित भाषणे झाली .याप्रसंगी संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ . विद्या देशपांडे , प्रा. ध्येया देशमुख मॅम यांची प्रमुख उपस्थिती होती.पोषण सप्ताह निमित्त 'आरोग्य व आहाराचा परस्पर संबंध 'या डिजिटल पोस्टरचे अनावरणही याप्रसंगी संपन्न झाले. या सप्ताहानिमित्त भीत्तिपत्रकाचे प्रदर्शन व कडधान्यापासून पौष्टिक पदार्थ तयार करणे ही स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमास डॉ . संगीता कचरे , डॉ.वर्षा मुंडे , डॉ . जोशी आर . एल . , प्रा . डॉ . राजकुमार यल्लावाड , प्रा. गोविंद कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.के. बी.देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.रागिणी पाध्ये यांनी केले .