ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता.

"माजी मंत्री तथा आमदार संदिपान भुमरे यांच्या समर्थाकडून फटाके फोडून जल्लोश"

पाचोड(विजय चिडे) पैठण ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना प्रकल्पास 890.64 कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेता मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.याकरीता पाचोड ता.पैठण येथे माजी मंत्री तथा आमदार संदिपान भुमरे यांच्या समर्थाकांनी फटाके फोडून जल्लोश साजरा करण्यात आला आहे.

पैठण ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना ही उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात असून जायकवाडी प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात प्रस्तावित आहे. या प्रकल्पाद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सुमारे 65 गावामधील 20 हजार 265 हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना या प्रकल्पास तृतीय सुधारित प्रशासकीय सन 2009 मध्ये देण्यात आली होती. आजच्या निर्णयानुसार या प्रकल्पास जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2018-19 च्या दरसूचीवर आधारित चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.