परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

"सुशोभिता वेलफेअर एसोसिएशन प्रा.लि,

ह्युमनवेल & अँटीकरप्शन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने"दिला जाणारा "भारत गौरव पुरस्कार२०२२" मराठवाड्यातील व्यसनमुक्ती चळवळीचे नेते श्री तुळशीराम पवार यांना प्रदान करण्यात आला. दिनांक 8 सप्टेंबर 2022 रोजी राजर्षी शाहू छत्रपती स्मारक, दसरा चौक, कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभहस्ते "भारत गौरव पुरस्कार 2022" हा पुरस्कार देउन गौरव करण्यात आला आहे.

"सुशोभिता वेलफेअर एसोसिएशन प्रा.लि.

ह्युमनवेल & अँटीकरप्शन इंडिया फाऊंडेशन" च्या मॅनेजिंग डायरेक्टर शोभा कोकिटकर यांच्याकडून पुरस्कारा साठी निवड करण्यात आली होती.

कोणत्याही संस्कृतीच्या संवर्धन, संगोपन आणि संरक्षणासाठी समाजातील विविध कार्यक्षेत्रांना विशेष महत्त्व असते. संस्कृतीची नीतिमूल्य व वैशिष्ट्ये शोधून त्यांचे जतन, विकास व प्रचार - प्रसार करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची असते. एक जबाबदार व कर्तव्यदक्ष समाज घटक या नात्याने आपल्या कार्यातून नव्या पिढीस संस्कार, साधना व सत्कार्यासाठी प्रेरणा देण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती निस्वार्थपणे सेवा देत आहेत. आदर्श जीवनमूल्यांचे दर्शन घडवत आहेत. आपल्या विशाल कर्तुत्वाने समाज मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या "मराठवाड्यातील व्यसनमुक्ती चळवळीचे नेते तुळशीराम पवार" यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांना "भारत गौरव पुरस्कार 2022" सुशोभिता वेल्फेअर असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड ह्यूमन मेल अँड अँटिकरप्शन इंडिया फाउंडेशन कडून पुरस्कार देऊन कृतज्ञता व्यक्त केल्या जात आहे.

मराठवाड्यातील व्यसनमुक्ती चळवळीचे नेते तुळशीराम पवार यांना मिळालेल्या या 

 पुरस्काराबद्दल सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.