केज :- 

केजमध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस उपनिरीक्षक कादरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी शहातून शस्त्र सज्ज पोलिसांचे पथ संचलन करण्यात आले. रोजा मोहल्ला, आंबेडकर चौक, मंगळवार पेठ, बस स्टॅंड, शिवाजी चौक या मार्गाने पथ संचलन करण्यात आले. यात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरसीएफ जवान, पोलीस कर्मचारी व गृह रक्षक दल हे सहभागी झाले होते. पथ संचलनात सहभागी झालेले शस्त्रसज्ज कमांडो नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. आणीबाणीची परिस्थितीत उदभवल्यास त्या विरुद्ध कार्यवाहीसाठी असलेले पोलीस दल आणि त्यांच्या कमांडोंची चपळाई ही गुन्हेगार आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना धडकी भरविणारी आ Noहे.