सुजाता लांडे हिचे निट परिक्षेत घवघवीत यश

घाटसावळी दिं ८(प्रतिनिधी)

निट २०२२चा निकाल नुकताच जाहीर झाला.यात पत्रकार सतिश लांडे सर यांची कन्या सुजाता सतिश लांडे हिने ७२०पैकी ६२१गुण मिळवून घवघवीत यश मिळाले आहे.

     घाटसावळी येथिल विद्यार्थ्यांनी कु सुजाता सतिश लांडे हिने निट २०२२मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत ७२०पैकी ६२१गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.घाटसावळी गावातील पहिला एम बी बी एस डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.गावाच्या शैक्षणीक क्रांतीत माणाचा तुरा रोवला आहे.विशेष बाब म्हणजे तिने सातवी पर्यंत चे शिक्षण घाटसावळी च्या जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलेले आहे.या तिच्या शैक्षणिक यशाबद्दल अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार, मित्रमंडळी नातेवाईक तसेच शिक्षक भारती व सर्व शिक्षक संघटना, शिक्षक वर्गातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.