नियोजन भवन येथे उज्वल भारत, उज्वल भविष्य उर्जा महोत्सवाचा समारोप

पंतप्रधान यांचे लाभार्थ्यांसोबत ऑनलाईन संबोधन कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध मान्यवर व लाभार्थ्यांची उपस्थिती 

गडचिरोली,दि.30: नियोजन भवन, गडचिरोली येथे दिनांक 30 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध ऊर्जा लाभार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद करुन लाभार्थ्यांनाबाबत माहिती जाणून घेतली व वीज वापराबाबतचे महत्व सर्वांना पटवून सांगितले. 

गडचिरोली येथे उज्वल भारत, उज्वल भविष्य उर्जा महोत्सवाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. कुमार आशिर्वाद, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, तसेच महावितरणचे मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ सुनिल देशपांडे, पॉवर फायनांस कॉर्पोरेयानचे महाव्यवस्थापक अरूण श्रीवास्तव, अधीक्षक अभियंता रविंद्र गाडगे, सुहास म्हेत्रे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. व कर्मचारीगण लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.