परभणी प्रतिनिधी
गुरुवार 8 सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या जोरदार पावसात वैतागवाडी शिवारात वीज पडून एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाला .घटना समजताच आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना पंचनामेसाठी बोलावून घेतले.
सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी शिवारातील बाबुराव वैतागे यांची म्हेस दुपारी तीन वाजता शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बांधली होती. यांचा मुलगा गवत आणण्यासाठी गेला असता सुरू असलेल्या पावसात अचानक वीज पडली. विजेच्या आवाजाने ते चांगले गोंधळून गेले. विज पडल्याने लिंबाच्या झाडाची फांदी मोडली. एक महिन्यावर वासराला जन्म देणाऱ्या अवस्थेत असलेल्या म्हशीचा जाग्यावर मृत्यू झाला. गावातील बालाजी निळे यांनी ही माहिती आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांना कळवताच अवघ्या एका तासात ते घटनास्थळी पोहोचले. पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ सावने, वडगाव येथील अधिकारी डॉ पोटभरे आदिना ही माहिती कळवण्यात आली होती. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती कळवली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत महसूल चे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. यावेळी राहुल साबणे शिवारातील गोविंद वैतागे, उदय बचाटे, विलास वैतागे ,दता वैतागे,ज्ञानोबा वैतागे, बालाजी खंडेकर, हनुमान बोडके आदी शेतकरी उपस्थित होते.