वाशी(आप्पासाहेब गोरे)

 वाशी,जि.उस्मानाबाद==कृषी प्रक्रिया जनजागृती पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग(PMFME) योजनेची तालुकास्तरीय कार्यशाळा दि.२४आँगष्ट रोजी आयोजीत करण्यात आली.तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाशी येथील सभागृहात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना चे राज्य समन्वयक श्री सत्यवान वराळे यांनी इच्छुक महिला,शेतकरी व इतर उद्योजक यांच्यासाठी योजनेची माहिती,अर्ज प्रक्रिया व प्रकल्पात अर्ज केलेल्या अर्जदारांची पुढील प्रक्रिया व अडचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन.यावेळी योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक श्री अभिमन्यू काशीद साहेब यांनी योजनेचा लाभ घेऊन वाशी तालुक्यातील जास्तीतजास्त शेतकरी,महिला,महिला बचत गट यांनी वेगवेगळ्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात उद्योजक व्हावे असे आवाहन केले.जिल्हा संसाधन व्यक्ती श्री निखिल शिंदे यांनी या योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया याबाबत माहिती देऊन इच्छुकांनी संपर्क केल्यास सविस्तर प्रकल्प आराखडा बनवून दिला जाईल अशी माहिती दिली.महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर श्री तुषार माने यांनी या योजने अंतर्गत बँक प्रस्ताव करणे व कर्जाशी निगडित अडचणींबाबत मार्गदर्शन केले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक श्री गोले , प्रास्ताविक श्री संतोष कोयले तालुका कृषी अधिकारी वाशी व आभारप्रदर्शन कृषी पर्यवेक्षक श्री साखरे यांनी केले.यावेळी श्री शुक्राचार्य भोसले उपविभागीय कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी श्री चव्हाण, खंडागळे , कदम व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील उद्योजक , शेतकरी व महीला शेतकरी उपस्थित होते.