उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री गणेशाची 31 ऑगस्ट रोजी स्थापना करण्यात आली होती उदगीर शहरातील गणेशाची विसर्जन सहा ऑगस्ट रोजी करण्यात आले तर पोलीस प्रशासनाने शहर पोलीस ठाण्यात स्थापन केलेल्या गणेशाचे विसर्जन आठ ऑगस्ट गुरुवारी करण्यात आले पोलीस प्रशासनाने गणेश विसर्जनाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत शहरातून करण्यात आली उदगीर शहरातल्या तळवेस भागातील विहिरीमध्ये श्री गणेशाची विसर्जन करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन पोलीस उपनिरीक्षक व्यंकट शेळके पोलीस नाईक गजानन फुलेवाड पोलीस नाईक भंडारी अजय पोलीस नाईक विनायक चव्हाण पोलीस नाईक बबन चव्हाण पोलीस नाईक चामे पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर राठोड पोलीस पोलकर पोलीस उपनिरीक्षक देवानंद फडेवार आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते