माननीय संजय बनसोडे साहेब आमदार उदगीर तथा माजी गृहराज्यमंत्री यांचे संकल्पनेतूनच तसेच माननीय जिल्हाधिकारी लातूर यांचे मार्गदर्शनाखाली उदगीरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोजे वाढवणे येथील शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिका वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावाचे प्रथम नागरिक तथा सरपंच श्री नागेश थोटे कार्यक्रमात श्री कल्याण पाटील माजी सभापती जिल्हा परिषद लातूर व प्राध्यापक श्री श्याम ढवळे राष्ट्रवादीचे नेते तसेच अनंतपरसेवार जिल्हा उपाध्यक्ष ग्राहक मंच लातूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवशंकर बेंबळगे नायब तहसीलदार पुरवठा यांनी केले तसेच सूत्रसंचालन श्री गणेश हिवरे मंडळाधिकारी वाढवणे यांनी केले कार्यक्रमात मोजे वाढवणा येथील एकूण चार रास्त भाव दुकानातील एकूण 506 लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात शिधापत्रिका तहसीलदार माननीय राजेश्वर गोरे साहेब यांचे हस्ते वाटप करण्यात आल्या सदर कार्यक्रम हा तालुक्यात 100% राबविण्यात येणार असल्याचे माननीय रामेश्वर गोरे तहसीलदार उदगीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून मौजे वाढवणे येथील जनतेस शिधापत्रिका संदर्भात समस्या बाबत चर्चा करण्यात आली तसेच शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती दिली त्यात सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी 100% करणे करिता सर्वांनी आपल्या पिकाची नोंद करून घेण्याच्या सूचना दिल्या 15 सप्टेंबर पर्यंत सर्वांनी आपले मतदान कार्ड हे आधार कार्ड सोबत लिंक करून घेण्याचे आवाहन केले तसेच मोजे वाढवणे येथील लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचे परिपूर्ण अर्ज देण्याकरिता सूचना दिल्या त्या अनुषंगाने सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अर्जावर नियमानुसार मंजुरी देण्यात येईल असे सांगितले ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झाले आहे त्याबाबत अहवाल शासनास पाठवून दिला असून शासनाच्या सूचनेप्रमाणे अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात येईल असे सांगितले कार्यक्रमात दत्ता बामणे माजी पंचायत समिती सदस्य श्री ज्ञानेश्वर शिरसागर उपसरपंच वाढवणा पुरवठा विभागाचे अवबल कारकून श्री मंजूर  मुलतानी शेख व मोजे वाढवणा तलाठी श्री आकाश अनुरे व वाढवणा गावातील शिधापत्रिकाधारक लाभार्थी तसेच शेतकरी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते