पाथरी:-जुन महिण्यात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार सोबत घेत शिवसेनेत बंड केल्या नंतर परभणी जिल्ह्यातून शिंदे गटाला थंड प्रतिसाद मिळाला होता. त्या नंतर सिल्लोड येथील आ सत्तारांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील शिवसेनेच्या काही माजी पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.गुरूवारी ८ सप्टेबर रोजी पुर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आता राकाँचे पाथरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोकराव गिराम तसेच राकाँचे माजी पाथरी तालुका अध्यक्ष राहिलेले माजी नगरसेवक विठ्ठलराव रासवे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

या वेळी खा श्रीकांत शिंदे,माजी खा सुरेश जाधव,शिंदे गटाचे पाथरी तालुका प्रमुख गोविंदराव गायकवाड,गंगाखेडचे तालुकाध्यक्ष मुंडे यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर विद्यमान खासदार आणि परभणीच्या आमदारांनी पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहाण्याचा निर्धार केल्याने. शिंदे गटाला परभणी जिल्ह्यातुन सुरूवातीला थंड प्रतिसाद मिळाला होता. या नंतर मात्र सद्य स्थितीत विविध पक्षात कार्यरत असलेले माजी शिवसैनिक एकवटत असून त्यांनी शिंदे गटाचा पर्याय निवडला असल्याचे चित्र समोर येत आहे.

पाथरी तालुक्यातून या पुर्वी पं सचे माजी सदस्य गोविंदराव गायकवाड,माजी सभापती दत्तु नागमोडे यांच्या सह अन्य काही जनांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्या नंतर गुरूवार ८ सप्टेबर रोजी राकाँचे पाथरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोकराव गिराम,राकाँचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव रासवे यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शिंदेगटात प्रवेश केला. या विषयी मागिल अनेक दिवसां पासुन पाथरी शहर आणि तालुक्यात चर्चा होती या चर्चेला आता पुर्ण विराम मिळाला आहे.

१२ सप्टेबर ला पैठण येथे दिग्गजांचा होणार शिंदे गटात प्रवेश?

रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण येथे १२ सप्टेबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याच कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील काही मात्तब्बर नेत्यां सह तीस जन शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रिशीर सुत्रां कडून मिळाली आहे. या बहुतांशीजन शिवसेनेत काम केलेलीच मंडळी असल्याचे सांगण्यात येत असून हा जिल्ह्यातील शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.