पाटोदा (गणेश शेवाळे) सुरक्षिततेचा वसा घेऊन काम करीत असलेल्या पोलिसांना स्वत:च्या घरच्या सणावाराला जाण्यापेक्षा कर्तव्याचा सण पार पाडण्याची जबाबदारी महत्त्वाची वाटते.म्हणून सणासुदीला घरी नसणाऱ्या पोलिसांकडून यावर उपाय म्हणून पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये पहिल्यांदाच गणपतीची स्थापना करून गणपती बाप्पाची मनोभावाने दररोज पूजा अर्चा करून पहिल्यांदाच

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पाटोदा पोलिस स्टेशन मध्ये बसवण्यात आलेल्या गणपतीचे आज वाजत गाजत विसर्जन करण्यात आलंय गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना नाचण्याचा मोह काही आवरता आला नाही. देहभान विसरून पाटोदा पोलिस स्टेशन अधिकारी व पोलीस कर्मचारी नाचण्यात दंग झालेले बघायला मिळाले.. पोलीस गाडीवर गणरायाची मुर्ती ठेवून मिरवणूक काढण्यात आली होती. पाटोदा पोलिसांनी अगदी नाचत-गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन केलं