आदिवासी बहुल भागामध्ये csc केन्द्र चालक गोकुळ आठवले यांनी धरमवाडी गावामध्ये जावून ekyc केली असून जे शेतकरी घरी नाहीत त्यांच्या शेतात जावून ekyc करवून घेतली.त्यामुळे त्यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी या केंद्रसरकारच्या योजनेमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना ekyc करणे बंधनकारक केले असून कोणताही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासन स्तरावरून काळजी घेतली जात असून याबाबत आदेशित केले असताना ग्रामीण भागामध्ये इंटरनेट ची कनेक्टविटी सतावत असतानाही माळेगाव नाजिक किन्ही येथील csc केन्द्र चालक गोकुळ आठवले यांनी धरंमवाडी गावामध्ये जावून पात्र शेतकऱ्यांची ekyc केली आहे. तर जे शेतकरी घरी आढळून आले नाहीत त्यांच्या शेतामध्ये जाऊन ekyc पूर्ण केली.तर रामदास पाखरे हे शेतकरी कुटुंबासह शेतात रहवायास असल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये जावून त्यांची ekyc केली.त्यामुळे केन्द्र चालक गोकुळ आठवले यांनी कोणताही शेतकरी वंचित राहू नये याची खबरदारी घेतल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.