थेरगाव येथील सोसायटीच्या चेअरमनपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास गोलांडे

पाचोड(विजय चिडे)नुकतीच थेरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत शिवशाही विकास पॅनलचे सर्व तेरा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. चेअरमनपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास गोलांडे तर कल्याण निर्मळ यांची व्हॉइस चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.चेअरमन , व्हाईस चेअरमन ,व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री आदरणीय नामदार संदिपानजी भुमरे पाटील,मा.अर्थ व बांधकाम सभापती विलास बापू भूमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती राजू नाना भुमरे , पंचायत समिती पैठणचे उपसभापती कृष्णा भूमरे,पाचोडचे सरपंच शिवराज भूमरे,जिजा भूमरे इत्यादींनी स्वागत केले. याप्रसंगी शेख कठ्ठु भाई,लक्ष्मण भुसारे, नामदेव गाडेकर,दाविद आहेर, आण्णासाहेब हरिश्चंद्र निर्मळ, नामदेव सांगळे, अंकुश मोरे, विष्णू ताकपीर, रोहीदास जाधव, संभाजी उबाळे, आप्पासाहेब कोल्हे ,रामकिसन निर्मळ, बाळासाहेब उबाळे, एकनाथ कोल्हे, हरिभाऊ निर्मळ, आप्पासाहेब गुंजाळ, अशोक निर्मळ,सुभाष निर्मळ,ज्ञानेश्वर ताकपिर,संजय भुसारे,राजू शेख, शिवाजी पठाडे, अनिल आहेर,दत्ता चोरमारे इत्यादी उपस्थित होते.