सोलापूर - किराणा दुकानाला जाऊन माल घेऊन येते असे सांगून गेलेली २४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे.याबाबत संबंधित तरूणीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.सोनाली अंगद मिश्रा वय 24 (रा. बोळकोटे नगर सोलापूर) असे तरुणीचे नाव आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
किराणा दुकानाला जाऊन येते म्हणून गेली ती परत आलीच नाही-
सोनाली मिश्रा ही आपल्या पालकांना दिनांक 1 सप्टेंबर रोजी किराणा दुकानाला जाऊन येते असे सांगून गेली होती.किराणा दुकानाला जात आहे अशी माहिती तिने आईला सांगून गेली होती.राहत्या घरातून तरुणी निघून गेली असून अद्याप पर्यंत घरी परत आली नाही. तिच्या नातेवाईकांनी व सर्व ठिकाणी शोध घेतला पण ती कुठेच मिळून आली नाही.तरूणीचे वडील अंगद मिश्रा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता बाबत फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक नवले हे करत आहे.