केसनंद येथे स्वखर्चातून गणेश विसर्जन हौद. 

मा.उपसरपंच रामकृष्ण सातव यांच्या सहकार्यातून

वाघोली /प्रतिनिधी

केसनंद (ता.हवेली)येथील नागरिकांना गणेश विसर्जन करण्यासाठी स्वखर्चातून विसर्जन हौद उपलब्ध करून देण्यात आला आहे.यामुळे केसनंद येथील सोसाट्यामधील नागरिक व ग्रामस्थांना या हौदात गणेशाचे विसर्जन करता येणार आहे. विहरीमध्ये किंवा ओढ्यात, नदीमध्ये गणेशाचे विसर्जन केले जाते.त्यामुळे पाण्याचे प्रदुषण होते. रामकृष्ण सातव यांच्या वतीने स्वखर्चाने हौद उपलब्ध करून देण्यात आला असून हौदात गणपती बाप्पांची विसर्जन करावे असे आवाहन मा.उपसरपंच सचिन जाधव यांनी गणेश भक्तांसह गणेश मंडळ व नागरिकांना केले आहे.