परभणी- सेलू तालुक्यतील १० वर्षीय बालिकेवर दोन नराधमांनी केलेला अत्याचार हा अमानवी असून त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला न्याय द्यावा, पोलीसानी एक महिण्याच्या आत दोषारोपपत्र दाखल करावे आणि आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी करुन आपणही या प्रकरणी आरोपींना शिक्षा होण्यासाठी आवाज उठविणार असलयाचे आ. गुट्टे म्हणाले. 

      आज दि. ७ सप्टेंबर रोजी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी परभणी येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासनाने भेट घेऊ दिली नाही. त्यामुळे आ. गुट्टे यांनी पत्रकाराशी संवाद साधताना आपले मत व्यक्त केले.

पुढे बोलताना आ. गुट्टे म्हणाले की जिल्हा पोलीस अधिक्षक जंयत मिना यांच्या अकार्यक्षमतेमुळेच जिल्ह्यात सद्या कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असून त्याला पोलीस प्रशासनाची उदासीनता जबाबदार आहे. काल एकाच दिवसात जिल्ह्यात २ मोठया घटना घडल्या आहेत. परभणी येथील सचिन पाटील यांचा खून आणि सेलूच्या बालिकेवरील अत्याचार हा त्याचाच परिपाक असून पोलीस प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत पीडितेच्या कुटुंबियांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आ. गुट्टे यांनी दिले.

        यावेळी गणेशराव रोकडे, संदीप अळनुरे, सचिन देशमुख , माधवराव गायकवाड, बालासाहेब रोकडे, रवी कांबळे, आदी उपस्थित होते.