उदगीर दिनांक 6 सप्टेंबर 2022 राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेने मूल्यांकनात 3.36 सीजीपीए सह ए प्लस मानांकन दिले न्याक सदस्य समितीचे चेअरमन डॉक्टर आर डब्ल्यू अलेक्झांडर जेसुधासन डॉक्टर श्रीनिवास रेड्डी डॉक्टर राजू जॉर्ज यांनी दिनांक एक व दोन सप्टेंबर 2022 रोजी महाविद्यालयाची पाहणी करून हे मानांकन दिले आहे ए प्लस मानांकन मिळवा मिळवणारे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे मराठवाड्यात दुसरे तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पहिले महाविद्यालय ठरले आहे महाविद्यालयास मिळालेले हे यश खूप मोठे आहे याबद्दल उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी तात्काळ महाविद्यालयात उपस्थित राहून सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी उपाध्यक्ष डॉक्टर रेखा रेड्डी व एडवोकेट प्रकाश सोनारी सचिव रामचंद्र तिरुके सहसचिव एडवोकेट एस टी पाटील व डॉक्टर आर्यन लखोटिया कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी एम संधी कर उपप्राचार्य डॉक्टर आर के मस्के न्याक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर के आर गव्हाणे यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी पालक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत