मंत्री संदिपान भुमरे हे लोकनेतेच- शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ
"पाचोड येथे आयोजित बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका"
पाचोड(विजय चिडे)पैठण तालुक्याचे आमदार शिंदे सरकारमधील सत्तेच्या सर्वात मोठ्या खुर्चीवर जाऊन बसलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे हे लोकनेते होते लोकनेते आहेत आणि लोकनेते यापुढेही राहणार असल्याचे प्रतिपादन शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पैठण येथे 12 तारखेला होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भव्य सभेच्या पाचोड येथील नियोजन बैठकीत बुधवार (दि.७) रोजी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करता वेळी केले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश पवार, उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, बांधकाम सभापती विलास भुमरे तालुकाप्रमुख आन्ना भाऊ लबडे, युवासेना जिल्हाप्रमुख किशोर चौधरी तालुकाप्रमुख मंगेश गावंडे माजी ,पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू भुमरे पाचोड सरपंच शिवराज भुमरे माजी सरपंच अंबादास नरवडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना,शिवसेनाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी नुकत्याच कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण येथील एका रक्तदान शिबिराला उपस्थिती दर्शविल्या प्रसंगी खुर्च्या रिकामी असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावरून त्यांच्या मागे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असल्याप्रमाणे जनाधार नसल्याचा आरोप करण्यात आला होता या आरोपाचा चांगलाच समाचार घेत राजेंद्र जंजाळ यांनी विरोधी पक्ष नेते व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर टीका करत म्हणाले की जे लोक जनतेतून निवडून येऊ शकत नाही ज्यांना विधान परिषदेच्या मागच्या बाजूने पाठवण्याची वेळ आमच्यावर येते अशा नेत्यांनी लोकनेते संदिपान भुमरे यांच्या विषयी बोलू नये अशा कडव्या शब्दात टीका केली आहे तर खैरे हे साहेब म्हणण्याच्या लायकीचे नाही.येत मात्र वयामानाने त्यांना साहेब म्हणावं लागतं ते अनेक वर्ष खासदार राहिलेत मात्र अध्यापन मंत्री होऊ शकले नाहीत आणि ते संदिपान भुमरे यांना गावठी असल्याचा उल्लेख करत आहेत खैरे यांना जनतेचे प्रेम कधी मिळालं नाही ते प्रेम मंत्री संदिपान भुमरे यांना मिळाले आहे. संदिपान भुमरे हे लोकनेते होते लोकनेते आहेत आणि यापुढें ही लोकनेते राहणार आहेत हे 12 तारखेला पैठण नगरीत होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सभेत दिसेल या होणाऱ्या भव्य दिव्य सभेला पैठण तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून उपस्थित राहून विरोधकांना लोकनेते संदिपान भुमरे यांच्या पाठीमागे असल्याची दाखवून द्यावे असा आव्हान यावेळी शिवसेनाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती कृष्णा भुमरे, मुरमा सरपंच शिंदे, उपसरपंच मापारी,पाचोड खुर्दचे सरपंच नितीन वाघ,माजी सरपंच एकनाथ जाधव, जिजा पंच भुमरे आबासाहेब भुमरे, दत्तात्रय भुमरे, पाचोडचे उपसरपंच शिवाजी भालशिंगे, भगवत नरवडे, सह पाचोड गट आणि गणातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.