आज दि. सात ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत जऊळका येथे तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली असून यामध्ये सुरेश गर्दे यांची बहुमताने निवड करण्यात आली.तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज ग्रामसभा आयोजित करून यामध्ये सुरेश गर्दे ,भीमराव इंगळे, रूपसिंग ठाकूर, नागेश अवचार, अमर ढाले, संतोष रावेकर यांच्या मधून सुरेश गर्दे यांची बहुमताने निवड झाली असून यावेळी ग्रामपंचायत सचिव करवते मॅडम, सरपंच सुवर्णाताई लांडगे, जऊळका बीटचे जमादार काळदाते, कल्ले यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.