त्या दोन नराधमांच्या मुसक्या आवळण्यात आले पोलिसांना अखेर यश आले. बुधवार 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील राजेगाव शिवारातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

सेलू येथील १० वर्षीय चिमुकली आणि तिच्या भावास काल दोन नराधमांनी फूस लावून आपल्या दुचाकीवर बसून अपहरण केले. वालूर मार्गे कौसडी येथे आल्यानंतर त्यांनी चिमुकलीच्या भावास फाट्यावर सोडून दिले. त्यानंतर दोन्ही नराधमांनी पीडित चिमुकलीवर कोक शिवारात जबरदस्तीने अत्याचार

माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले. सेलू पोलिसात गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मीना, सहायक पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखली उपविभागीय पोलिस अधिकारी गोफने, स्वागुशा पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस निरीक्षक दंतुलवार, सपोनि मुळे आदींनी आरोपितांचा शोध घेण्यासाठी बोरी आणि जिंतूरच्या परिसरात अवघ्या पोलीस प्रशासनाला कर्तव्यावर लावले होते. जिंतूर आणि बोरी येथे तर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने छावणीचे स्वरूप आले होते. घटनेनंतर पसार झालेले आरोपी जिंतूर आणि बोरी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची करून चक्रे अधिक गतिमान केली. गुपित जिंतूर जिंतूर : दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधमांना जिंतूर पोलिसांनी राजेगाव शिवारातून ताब्यात घेतले. 

माहितीच्या साहाय्याने पो. ना पांडुरंग तूपसुंदर, मुकेश बुधवंत यांनी मोठ्या शिताफीने तालुक्यातील राजेगाव शिवारातून दोन्ही नराधमांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले. सदरील आरोपी तालुक्यातील मानमोडी येथील रहिवाशी असून अंगद घुले आणि

तुकाराम धुले अशी आरोपींची नावे असल्याचे समजते. दोन्ही आरोपीतांना सेलू पोलीस ठाण्यात नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. दोन दिवसांपासून जीवाचे रान करणाऱ्या परभणी पोलिसांच्या अद्वितीय कामगिरीला अखेर यशाचे तोरण लागले आहे. इंन्सेटमध्ये दोन्ही आरोपी ची महिती मिळताच

माहितीच्या साहाय्याने पो. ना पांडुरंग तूपसुंदर, मुकेश बुधवंत यांनी मोठ्या शिताफीने तालुक्यातील राजेगाव शिवारातून दोन्ही नराधमांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले. सदरील आरोपी तालुक्यातील मानमोडी येथील आरोपीतांना सेलू पोलीस ठाण्यात नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. दोन दिवसांपासून जीवाचे रान करणाऱ्या परभणी पोलिसांच्या अद्वितीय कामगिरीला अखेर यशाचे तोरण लागले आहे. पुठील तपास करीत आहे.