बीड (प्रतिनिधी) रोटरी क्लब सामाजिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असतं. रोटरी क्लबने आता डायलेसिसची सुविधा निर्माण केली आहे. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये गोरगरीब रुग्णांवर डायलेसिस करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या पदाधिकार्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.डायलेसिस करण्यासाठी रुग्णांना औरंगाबाद सारख्या शहरामध्ये जावे लागते. मात्र रोटरी क्लबने आता बीड शहरातच डायलेसिसची सुविधा उपलब्ध केली.
10 सप्टेंबर रोजी या प्रोजेक्टचे लोकार्पण होणार आहे. यासाठी हरीश मोटवाणी, सुनिल जोशी, जनार्दन राव, प्रमोद पारीख, क्षितीज झावरे, मनोहर महाजन यांनी प्रयत्न केलेले आहेत. असे रोटरीचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी आदी पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील नावनोंदणी कार्यक्रम स्थळीच होणार आहे. त्यानंतर मशीनची उपलब्धता व वेळ याचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने रुग्णांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन रोटरीच्या वतीने करण्यात आले आहे