यवतमाळ : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सुविधा उपलब्ध होत नसल्याने गर्भवती महिलांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रसूतीसाठी रेफर करण्याचे प्रकार नेहमीच घडतात. एका महिलेला प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना प्रसूती कळा सुरू झाल्या. यावेळी समयसूचकता दाखवत मालखेड आरोग्य केंद्रात तत्काळ हलवून सुखरूप प्रसूती करण्यात आल्याने नवजात शिशूला जीवदान मिळाले. दारव्हा तालुक्यातील लोही येथील जया रजनीश इंगोले (वय 25),असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. कर्मचारी व डॉक्टर सर्वांच्या समन्वयातून मालखेड उपकेंद्रात प्रसूती करण्यात आली. महिलेने1,700 ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात रेफेर केले. आरोग्य कर्मचार्यांनी दाखविलेल्या समयसुचकतेबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. बी. गाढवे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. पी. एस.ठोंबरे यांनी कर्मचार्यांना प्रोत्साहीत केले.
मालखेड येथील आरोग्य उपकेंद्रात महिलेची प्रसूती : कर्मचार्यांच्या समयसुचकतेमुळे नवजात शिशूला जीवदान मालखेड येथील आरोग्य उपकेंद्रात महिलेची प्रसूती : कर्मचार्यांच्या समयसुचकतेमुळे नवजात शिशूला जीवदान मालखेड येथील आरोग्य उपकेंद्रात महिलेची प्रसूती
