यवतमाळ : प्रतिष्ठीतांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 17 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण चार लाख32 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वडगावातील पल्लवी लॉनमागे असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली.वडगाव परिसरात आशीष आत्राम याच्या घरी विजय लंगोटे हा व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी जुगार खेळ भरवित असल्याची टीम अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी छापा टाकला असता, एका महिलेसह 17 जुगारी मिळून आले. त्यांच्याकडून रोख एक लाख 52 हजार 140 रुपये रोख, 78 हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल, दोन लाख दोन हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी असा एकूण चार लाख 32 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. जुगारींविरुद्घ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, एसडीपीओ संपत भोसले, पोलिस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी केली.
वडगावातील प्रतिष्ठीतांच्या जुगार अड्ड्यावर अवधुवातडी पोलिसांची धाड ; 17 जुगारीकडून सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/09/nerity_51c629c41929ff499bab011074edad84.jpg)