औरंगाबाद : ६ स.(दीपक परेराव) - तमाम शिवसैनिकांच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे यांचा ६ सप्टेंबर रोजी स्मृतीदिन असल्याने राज्यभर अभिवादन करण्यात आले. शिवसेना औंरगाबाद संभाजीनगरच्या वतीने गुलमंडी येथे भावभक्ती गितांनी मॉसाहेब मिनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मॉसाहेब मिनाताई ठाकरे यांच्या आठवणी सांगत स्मृतींना उजाळा दिला.
आलाप प्रस्तुत सरला शिंदे व अभिजीत शिंदे यांच्या टिमने सुमधुर गायीलेल्या गितांनी गुलमंडी परिसर मंत्रमुग्ध होवुन गेला. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माऊली माऊली, शिवसेना गित, हंबरुन वासराले चाटती जव्हा गाय तव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय या गितांनी महिला वर्ग गहिरवरुन गेला.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सौ. वैजयंती खैरे, महानगप्रमुख माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, आनंद तांदूळवाडीकर,पूर्व विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाल कुलकर्णी, अक्षय खेडकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, महिला आघाडी संपर्क संघटक सुनीता आऊलवार, जिल्हा समन्वयक कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपशहरप्रमुख हिरालाल सलामपुरे, राजू खरे, राजू इंगळे, कमलाकर जगताप, माजी नगरसेवक सचिन खैरे, सतीश कटकटे, सोपान बांगर, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, नलिनी बाहेती, दुर्गा भाटी, विधानसभा संघटक मिरा देशपांडे, नलिनी महाजन, शहरसंघटक भागुबाई शिरसाट, प्राजक्ता राजपुत, विद्या अग्निहोत्री, आशा दातर, उपशहर संघटक सिमा गवळी, अरुणा भाटी, सुषमा यादगिरे, राजश्री राणा, माजी नगरसेविका पदमा शिंदे, लोखंडे, शिवअंगणवाडी सेनेच्या मंजुषा नागरे, रेणुका जोशी, अलका कांदे, पद्मा तुपे, क्षमा वैद्य, व्यापारी आघाडी विजय सूर्यवंशी,
राम वारेगावकर, विनोद माने, राजू खरे, भरत लकडे, अशोक पुंड, सुशांत डांबरे आदींसह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडींची उपस्थिती होती.