वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबागच्या वतीने सर्पमित्र मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. थथ ही संस्था गेली अनेक वर्षे अलिबागमध्ये वन्यप्राणी व साप बचावाचे तसेच जखमी अथवा आजारी प्राण्यांवर योग्य तो औषधोपार करून त्यांना पुनः नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे कार्य करीत आहे.
कार्यशाळेमध्ये डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी अलिबाग आणि मुरुड तालुक्यांमध्ये सापडणार्या सापांविषयी माहिती दिली. तसेच त्यांच्याबद्दल असलेले अनेक गैरसमज दूर केले. डॉ. वैभव देशमुख यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. समितीचे सदस्य अदिती सगर आणि ओमकार कामतेकर यांनी सापांचे बचावकार्य व त्यासाठी लागणारे साधन या विषयी अत्यंत मोलाची माहिती काही प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांना दिली. लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद यावेळी पाहायला मिळाला. सदर कार्यक्रमानंतर उपस्थितांच्या साप आणि बचाव कार्यासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली