परभणी जिल्ह्यातील युवतींना सुरक्षित आणि चांगले शिक्षण मिळावे ही कमलताई जामकर यांची इच्छा रावसाहेब जामकर यांनी महिला महाविद्यालय स्थापन करुन पुर्ण केली. आजतागायत संस्थेसह महिला महाविद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.आज कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय महिला सक्षमीकरणाची नांदी ठरत आहे.प्रसंगी व्यवस्थापना बरोबरच गुरुजन,पालक, विद्यार्थीनींचे योगदान लाभल्याने संस्था गुणात्मक विकास साधत आहे, असे प्रतिपादन ॲड.किरणराव सुभेदार यांनी केले. कै.सौ.कमलताई जामकर यांच्या जयंतीनिमित्त कै.सौ. कमलताई जामकर उत्कृष्ट शिक्षिका, महिला प्रशासकीय कर्मचारी, व विद्यार्थ्यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड.सुभेदार बोलत होते.प्रसंगी हेमंतराव जामकर (अध्यक्ष नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभण, संचालक सौ. दीपलक्ष्मीताई जामकर, संचालक ॲड.बाळासाहेब जामकर,सदस्या सौ.संध्याताई जामकर, सौ.सोनियाताई जामकर, सचिव विजयराव जामकर, प्राचार्य डॉ वसंतराव भोसले, मुख्याध्यापक आर. के .चव्हाण,जी.एन.शिंदे,सौ.कविता ढेंगळे आदींची उपस्थिती होती. या वेळी प्रा.डॉ.रविंद्र इंगळे रचित कमलगीत आणि प्रा.जयराम घनघाव रचित महाविद्यालय गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. काळाची गरज लक्षात घेत महाविद्यालयाने नवनवीन बदल स्विकारत विविध शैक्षणिक संकुले उभारत संस्थेच्या ध्येयपूर्ती साठी तयार राहावे.आई कै.सौ.कमलताई जामकर यांचेवर लेखनरुपी ग्रंथ व्हावा असा मनोदयही विजयराव जामकर यांनी व्यक्त केला. कै.सौ.कमलताई जामकर उत्कृष्ट शिक्षिका पुरस्काराने आपणास सन्मानित करण्यात आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पारितोषिकाची रक्कम महाविद्यालया साठी देत असल्याचे प्रा.डॉ.संगीता आवचार यांनी जाहीर केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट शिक्षिका प्रा.डॉ.संगीता आवचार कै.सौ‌ कमलताई जामकर महिला महाविद्यालय,सौ.मंजिरी गळाकाटू कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्रीमती अरुंधती गाजरे, नूतन मुला मुलींचे हायस्कूल, उत्कृष्ट प्रशासकीय कर्मचारी श्रीमती अनिता भेरजे ग्रंथपाल कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परभणी यांना रोख रक्कम, मानचिन्ह, प्रमाणपत्र,वृक्षरोप देवून सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थीनी पुरस्काराने कु ,कविता सातपुते कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी.कु. प्रणाली मालसमिंदर कै. रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,परभणी.कु. संपदा केंद्रेकर नूतन मुला मुलींचे हायस्कूल,परभणी.यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र,वृक्षरोप देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेड विद्यार्थी विकास मंडळ , राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि परभणी जिल्ह्यातील महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवानिमित्त आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी च्या संगीत विभागाच्या विद्यार्थीनींनी व्दितीय क्रमांक पटकावला विजेत्यांसह मार्गदर्शक डॉ.रविंद्र इंगळे, डॉ.पल्लवी कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कै.सौ.कमलताई जामकर जयंती निमित्त नूतन प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित कलाविष्कारात परभणी शहरातील प्राथमिक शाळांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे कै.सौ.कमलताई जामकर यांच्या जीवनावर आधारित नूतन प्राथमिक शिक्षणालयाने सादर केलेली 'आई शोधू कुठे मी तुला ' ही बालनाटीका विशेष आकर्षण ठरली.सुरुवातीस गणेश स्तवन घेण्यात आले. या स्पर्धेत बाल विद्या मंदिर वैभव नगर परभणी शाखेने ३००० रुपयाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले . गांधी विद्यालय एकता नगर परभणी २००० रुपयाचे द्वितीय पारितोषिक पटकावले.एन .व्ही .एस. मराठवाडा प्राथमिक शाळा परभणी य तृतीय क्रमांक क्रमांकाचे १५०० रूपयाचे पारितोषिक तर उद्धेश्वर प्राथमिक शाळा, परभणी आणि छत्रपती शाहू महाराज विद्यालय परभणी ने उत्तेजनार्थ प्रत्येकी १००० रुपयाचे पारितोषिक प्राप्त केले. अशा विजेत्या सर्व बालगोपाळांना,मार्गदर्शक शिक्षक, आणि प्रशालेला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.मुख्याध्यापक सौ.कविता ढेंगळे आणि सर्व सहकारी शिक्षकांचे मान्यवरांनी कौतुक केले. सूत्रसंचालन व आभार प्रा अरुण पडघन यांनी केले.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं