महाराष्ट्र राज्यातील आकरा जिल्ह्यातील पशुधनामध्ये लंम्पी स्किन रोग प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले असल्याने केंद्र शासनाने प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये अधिसुचीत केलेल्या रोगामध्ये लम्पी चर्मरोग या रोगाचा अनुसूचीत रोग म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. 

          सदरचा विषाणूजन्य रोग प्राभाव विविध प्रकारचे डास, माशा, किटक, गोचीड, गोमाशा, इ. मार्फत फैलाव होतो. या रोगाची लागण आपल्या जिल्ह्यातील जनावरांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आज 5 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी तातडीने गटविकास अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक घेतली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी बैठकीत पुढील सूचना दिल्या. 

1- सदरची बाब आपल्या तालुक्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना अवगत करण्यात यावी. 

2- पशुपालकांना जनावरांचे गोठ्यातील साफसफाई व त्या लगतचा परिसरात किटक, गोचीड़, गोमाशा, डास, माशा इ. निर्मुलन करण्यासाठी प्रोत्साहित करून यांचे निर्मुलनाविषयी मार्गदर्शन करावे. तसेच मार्गदर्शक सूचनांनुसार विविध अलापंथी व आयुर्वेदिक फवारणीचा उपयोग करण्या बाबत पशुपालकामध्ये व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याबाबत गट स्तरावर सुचना देण्यात आल्या.

3- लम्पी स्किन रोगाचा नियमितपणे आढावा घेवून उपाययोजना करणे, प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमावर देखरेख ठेवणे, बाधित जनावरे कळपातून वेगळे करणे, बाधित जनावरावर औषधोपचार, विविध विभाग तसेच स्थानिक संस्थासमवेत योग्य तो समन्वय साधणे आणि मृत जनावरांची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे *यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आलेली आहे.* 

4- लंम्पी स्किन डिसीज रोगाबाबत रोग प्रादुर्भावा संबंधित मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या असून त्यानुसार आपल्या तालुक्यामध्ये लंपी स्किन रोगप्रादुर्भाव प्रतिबंध व नियंत्रणाबाबतशासन परिपत्रकातील सुचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी.

5- तालुक्यामधील गावांमध्ये व गोठ्यातील डास, माशा किटक व गोचीड यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी Deltamethrin, Cypermethrins. औषधींचा वापर स्थानिक पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करणे योग्य होईल. सदर रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरीता गावस्तरावर डास, माशा किटक व गोचीड यांचे निर्मुलन मोहिम स्वरूपात आयोजित करून जनजागृती अभियान राबविण्यात यावे.

6- सदर रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता खालीलप्रमाणे आवश्यक ती काळजी घेणे जास्त महत्वाचे आहे. 

7- बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. • निरोगी जनावरांना बांधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये.

8- जनावरांमध्ये हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे लंपी स्किन डिसीज सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.  

9- बाधित गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. तसेच गोठ्यात

10- त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. त्याकरिता १% फॉर्मलीन किंवा २.३ % सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ % यांचा वापर करता येईल.

11- या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी व त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी. सदर रोगाचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माश्या, गोचीड इ.) होत असल्याने आजारी नसलेल्या सर्व जनावरांवर तसेच गोठ्यात बाह्यकीटकांच्या निर्मुलनासाठी औषधांची प्रमाणात फवारणी करावी. • रोगनियंत्रणासाठी लसीकरण करणे आवश्यक असून बाधित गावांमध्ये व बाधीत गावांपासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना लसीकरण तसेच बाधित जनावरांना औषधोपचार करून घ्यावे.

12- रोगप्रादुर्भाव झाल्यास जनावरांची खरेदी-विक्री थांबवावी.

13- योग्य त्या जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी. बाधित जनावरांचे तात्काळ व योग्य औषधोपचार केले

14- अबाधित क्षेत्रात १००% लसीकरण केले तर या रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण करता येते • लम्पी स्कीन सदृश्य आजाराने बाधित पशुधन कार्यक्षेत्रात आढळल्यास त्वरित रोग नमुने घेणे व ते शीतसाखळीत रोग अन्वेषण विभाग यांना पाठविणे.

15- बाधित पशुधनास स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या बाबत मार्गदर्शन करणे. औषधोपचार सुरु करणे.

16- बाधित पशुधन आढळलेल्या गावात सर्व पशुपालकांना जागृत करणे. या रोगाचा गावातील पुढील प्रसार रोखण्या करीता बाधित पशुधनाच्या संपर्कात गावकरी व इतर पशुधन येणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सल्ला देणे,

17- बाधित गावाच्या ५ किमी त्रिज्येच्या परिसरातील गोवंश व म्हसवंश पशुधनाची संख्या काढणे. त्यानुसार लस मात्रांची मागणी नोंदविणे. लसमात्रा मिळवणे व वितरीत करणे.

18- बाधित क्षेत्रातील सर्व संस्थांना बाह्यकृमी नाशकांचा फवारा करण्यास कळविणे. डास माशाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेणे.

19- पशुसंवर्धन विभागने तालुकास्तरावर लसीकरणा साठी पथक व शिघ्र कृती दलाचे गठण करण्यात यावे. संपर्क अधिकारी निश्चित करून त्यांचा संपर्क क्रमांक सार्वजनिक करणे. विभागाचा टोल फ्री क्र कळविणे जिल्हा आपत्तीनिवारण विभागाचा संपर्क क्र. वर संपर्क साधण्यास अवगत करणे. 

20- रोग अन्वेषण विभाग यांचे निष्कर्ष सकारात्मक आल्यास जिल्हाधिकारी यांच्या द्वारे अधिसूचना प्रसिद्ध करणे. बाजार व पशुधन हालचाल आवश्यकतेनुसार नियंत्रित करणे.

21- बाधित गावाच्या ५ किमी त्रिज्येच्या परिसरातील गोवंश व म्हंसवंश पशुधनाचे (४ महिने वरील वयाच्या) लसीकरण करणे. जिल्हा माहिती अधिकारी यांचे मदतीने वर्तमानपत्रात जन जागृती करणे, प्रसिद्धों व प्रचार कार्यावाही करणे.

22- माहितीपत्रक तयार करणे व पशुपालकात वितरीत करणे, सदरची माहितीपत्रके पशुवैद्यकिय दवाखान्यावर जमा होणाऱ्या सेवाशुल्कातून खरेदी करण्यात यावीत.

 पशुवैद्यकिय संस्था प्रमुखांनी कार्यक्षेत्रातील गावांमध्ये व दूध संकलन केंद्रांना दोन दिवसात भेटी देण्यात येवून जनजागृतीची विशेष माहिम हाती घेण्यात यावी. यामध्ये ग्रामपंचायतींचाही सहभाग घेण्यात यावा. ग्रामपंचायतीमार्फत या रोगाबाबत

घ्यावयाच्या दक्षतेबाबत गावमध्ये प्रचार व प्रसिध्दी दवंडीव्दारे तसेच चित्राफितीव्दारे, सोशल मिडीयाव्दारे करण्यात यावे.

• क्षेत्रीय स्तरावरील सर्व पशुवैद्यकिय संस्थांमार्फत उपचार, प्रतिबंधात्मक लसीकरणाची व जनजागृतीची कार्यवाही साथरोग प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक असल्याने साप्ताहिक तसेच इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही पशुवैद्यकिय सेवा पशुपालकास उपलब्ध राहतील हे सुनिश्चित करावे,

• सर्व तांत्रिक अधिकारी व कर्मचारी या कालावधीत मुख्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे व सदर कालावधीत कोणत्याही स्वरूपाची रजा अनुज्ञेय राहणार नाही याबाबतही सर्वांना सुचना देण्यात आल्या. • सर्व पशुवैद्यकिय संस्थांनी पशुवैद्यकिय दवाखान्याच्या दर्शनी भागावर ठळक अक्षरात संस्था प्रमुखाचे नाव व संपर्क क्र. प्रदर्शीत करण्यात यावेत. 

यावेळी डॉ. एन. ए. सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ एन एल नरळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर, डॉ. एस. एस. बोरकर, पशुधन विकास अधिकारी (तां), जि.प. सोलापूर, सर्व गट विकास अधिकारी, सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते.