पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीतील गणेशोत्सव शांततापूर्वक पार पडावा म्हणुन आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अक्षय प्रकाश थोरात, वय २७ वर्षे, राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ, सोलापूर यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी स्थानबध्द केले आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

अक्षय प्रकाश थोरात हा मागील अनेक वर्षोपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी दहशत व भिती घालून नागरीकांविरुध्द गुन्हेगारी वर्तन केले आहे. तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व्यापारी व सामान्य नागरीक यांना दहशत व भिती घालून मंत्रीचंडक कॉम्पलेक्स, न्यु बधवार पेठ, सम्राट चौक, जी.एम. चौक, तुळजापूर नाका, मड्डी वस्ती, रुपाभवानी चौक, कस्तुरबा मार्केट, बलिदान चौक, कुंभार वेस, भुसार गल्ली, चाटी गल्ली, बाळीवेस, पुणे रोड या परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. या परिसरात घातक शस्त्रानिशी फिरुन हल्ला करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशिर जमाव जमवून गैरकृत्य करणे, घातक हत्यारे बाळगणे, दरोडा टाकणे,विनयभंग करणे, हत्याराचा धाक दाखवत अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणे यासारखे गंभीर गुन्हे करत असतो. अशा प्रकारची गुन्हेगारी कारवाई करुन अक्षय प्रकाश थोरात याने परिसरात दहशत व भिती निर्माण करुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करुन स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले आहे.

अक्षय प्रकाश थोरात याचे विरुध्द शहरातील जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलीस ठाण्यास एकूण ०४ गंभीर स्वरुपाचे व ०१ अदखलपात्र गुन्हा दाखल असल्याच्या नोंदी आहेत. त्यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०१९ मध्ये क. १०७ फौ.प्र. सं अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली होती.

अक्षय प्रकाश थोरात याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही, पुन्हा त्याने सन २०२२ मध्ये अलीकडील काळात त्याच्या साथीदारांसह फिर्यादीस शिवीगाळ करुन धमकी देऊन हॉटेल मालकास खंडणी मागुन हॉटेल मधील सामानाचे नुकसान करण्यासारखा गंभीर स्वरुपाचा स्वरुपाचा गुन्हा केला आहे.

अक्षय प्रकाश थोरात याचे विरुध्द वेळोवेळी कार्यवाही करुनही त्याच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही. त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी त्यास एमपीडीए अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यास आदेशाची बजावणी करुन येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यासाठी रवानगी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त, डॉ. राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्विकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची तिसरी व या वर्षातील सातवी कार्यवाही आहे.