महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेने ता 3 रोजी मालेगाव शहरातील ना ना मुंदडा विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या यात्रेद्वारे राज्यातील प्रत्येक तालुक्यात नव उद्दोगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य ,रोजगार ,उद्दोजकता व नाविन्यपूर्ण विभागा अंतर्गतही यात्रा सुरु आहे. मोबाईल व्हॅन द्वारे चल चित्राद्वारे या यात्रेचे महत्व समजावून सांगण्यात आले या योजनेअंतर्गत जिल्हा स्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा होणार आहे त्यानंतर राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा होणार आहे.या जिल्हा स्तरीय ,विभागीय स्तरिय ,राज्य स्तरीयसादरीकरण स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कमेचे पारितोषिक मिळणार आहे या स्टार्टअप यात्रेत सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी ना ना मुंदडा विद्यालयाचे उपप्राचार्य डॉ राधेश्याम पनपालिया ,पर्यवेक्षक दिनेश उंटवाल ,सौ संध्या उंबरकर ,प्रा वामन ,प्रा बयस , एस व्ही सी विभागातील प्रा एम एस तोष्णीवाल ,प्रा व्ही डी भोयर ,प्रा अरविंद गाभणे ,प्रा अनंतराव गायकवाड ,प्रा आनंद देवळे ,आर आर कळसे आदी उपस्थित होते.