औरंगाबाद:५ स.(दीपक परेराव) ज्ञानप्रकाश विद्यामंदिर गारखेडा परिसर औरंगाबाद येथे स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक दिनाचे अवचित्य साधून या समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं 5 सप्टेंबर हा दुसरे भारताचे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बरेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी अध्यापनाचा कार्य करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका बजावली या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी संजय बोराडे व विवेक राठोड हे उपस्थित होते याप्रसंगी संजय बोराडे म्हणाले की मी या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे या शाळेमुळेच मी उत्कृष्ट सामाजिक शैक्षणिक व राजकीय काम करू शकतो माझ्यासारखे व विवेक राठोड यांच्यासारखे अनेक विद्यार्थी या शाळेने घडविले आहेत यातील काही विद्यार्थी परदेशामध्ये मानाच्या हुद्द्यावर आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक एस पी जवळकर हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व महात्मा फुले यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमांमध्ये...वर्षा शर्मा, जिशान पिंजारी भक्ती आकात, पूजा घोडके, वैष्णवी भादवे, व्यंकटेश रामपल्लेवार, आकांक्षा तुरुकमाने, मिताली मुंडलिक, पुष्पक गावंडे, शिवराज गावंडे, शंकर सोन्नी आदींनी सहभाग घेतला . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश नागरे, गणेश पवार सुभाष मेहर ज्योती ठाकरे, संगीता निकम, रुपाली होले , अरुणा शेळके आदि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा तुरुकमाने .तर आभार प्रदर्शन पूजा घोडके हिने केले .
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं