राष्ट्रीय गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांच्या हस्ते महाआरती संपन्न

बीड दि.०६(प्रतिनिधी) पेठ बीड भागातील राष्ट्रीय गणेश मंडळाच्या श्री गणेशाची आरती सोमवारी बीड विधानसभेचे आमदार श्री संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली याप्रसंगी नगर सेवक सम्राट दादा चौव्हाण, जवाहरलालजी सारडा, राष्ट्रीय गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमृत काका सारडा, गिरीशजी गिलडा, अध्यक्ष डॉ. अभिजीत पायगुडे कार्याध्यक्ष नितीन सारडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष अमृत काका सारडा यांनी राष्ट्रीय गणेश मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती सांगून यावर्षी मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक गणेश विसर्जन मिरवणुकीचा माहिती देऊन गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रम यासह विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

या कार्यक्रमात आमदार संदीप भैया शिरसागर यांनी गणेश मंडळाच्या देखाव्याची पाहणी करून कौतुक केले व गणेश मंडळास शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अभिजीत पायगुडे यांनी आमदार संदीप भैया शिरसागर यांचा सत्कार केला.

यावेळी अमोल शेटे, महादेव कैवाडे, राम कदम, अशोक घोडके, अक्षय इगडे, ओंमकार सपकाळ, राम इगडे, सुशील महालिंगे, नितीन इगडे, तेजस महाजन आकाश इगडे संजय वाघोळे, वरद मुसळे, प्रमोद शिंदे यांच्यासह राष्ट्रीय गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.