पुणे : हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष तुषार हंबीर यांच्यावर अज्ञात दोन व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ससून रुग्णालयात काल सोमवारी (ता.०५) रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हंबीर यांचे प्राण वाचले आहे. तर या हल्ल्यात पोलीस कर्मचारी अमोल बगाड गंभीर जखमी झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तुषार हंबीर याच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हंबीर हे मागील अनेक वर्षांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे.त्यांच्यावर यापूर्वीही येरवडा कारागृहात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हंबीर यांची मागील आठ ते दहा दिवसापासून तब्बेत बिघडली होती. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तुषार हंबीर यांच्यावर उपचार सुरू असताना, काल सोमवारी (ता. ०५) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती हंबीर यांचे नातेवाईक असल्याचे भासवून ससून रुग्णालयात घुसले. त्यातील एकाने तुषार हंबीरवर गोळीबार केला. मात्र या गोळीबारात हंबीर वाचला.मात्र दुसऱ्या हल्लेखोरने कोयत्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी अमोल बगाड यांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हल्लेखोर आणि बगाड यांची झटापट झाली. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. मात्र यात बगाड हे गंभीर जखमी झाले आहेत.दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं