रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरूड तालुक्यात गेले पाच दिवस आनंदात राहणार्‍या बाप्पाला आणि काल पाहुणी म्हणून आलेल्या गौराई मातेला सोमवारी निरोप देण्यात आला. तालुक्यांत पाच दिवसांच्या 13362 गणपती बाप्पा तसेच 3 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

अलिबाग पोलीस हद्दीमध्ये1650 खासगी आणि दोन सार्वजनिक गणपती,पोयनाड पोलीस हद्दीमध्ये 3274 खासगी गणपती आणि एक सार्वजनिक गणपती,रेवदंडा पोलीस हद्दीमध्ये 4477खासगी गणपती,मांडवा पोलीस हद्दीमध्ये 1669खासगी गणपती तर मुरूड पोलीस ठाणे हद्दीत 2292 खासगी समुद्राच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. त्यासाठी अलिबाग, नगरपरिषदेकडून मुरूड नगरपरिषद त्याच प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतने गणेश घाटांवर नियोजन करण्यात आले होते.

अलिबाग,मुरूड नगरपरिषद, प्रत्येक ग्रामपंचायतीकडून सर्व गणेश विसर्जन घाटांवर विजेची रोषणाई, बैठक व्यवस्था करण्यात आली होती. 

अलिबाग नगरपालिका कर्मचार्‍यांकडून विसर्जनासाठी आलेल्या बाप्पांना होडीमधून खोल पाण्यात नेवून विसर्जन केले जात होते. हा सोहळा रात्री अकरापर्यंत सुरू होता. 

गौरी गणपतीचे शांततेत विसर्जन सोहळा व्हावा, यासाठी एसआरपीएफची तुकडी तसेच नव पोलीस आणि होमगार्ड तैनात होते. शिवाय अधिकारी देखील बंदोबस्तात मग्न होते. कर्जत पोलीस ठाणे येथे एसआरपीएफ तसेच शीघ्र कृती दल आणि पोलीस तसेच होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबागचे पोलीस निरीक्षक, रेवदंडा पोलीस निरीक्षक अशोक थोरात आणि पोयनाड सहाय्यक पोलीस निरीक्षक अतिग्रे,मांडवा पोलीस निरीक्षक राजू पाटील, तर मुरूड पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी बंदोबस्त कायम ठेवला होता.