मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेन किलोमिटर 25.800 माडप बोगदा येथे मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव इको कारने मागून ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात

कारमधील 5 प्रवाश्यांपैकी 2 जन जागीच ठार झाले. तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांस एम जी एम रुग्णालय पनवेल येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार तसेच पळस्पे आणि खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली. आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य आरोग्य सेवा, डेल्टा फोर्सच्या जवानांनी या ठिकाणी उपस्थित राहून मदत केली.