आज (5) सप्टेम्बर रोजी हजरत अबुबक्कर सिद्दीक रजि. उर्दू प्राथमिक विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षकदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माबुद कुरैशी सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रकांत दायमा साहेब उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनानिमित्त सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. शमसिर पटेल सर श्रीमती नुज़हत अंजुम
मॅडम शैख़ राज़ेक सर आल्हाज शैख़ अबुजर सरांनी (5) सप्टेम्बर शिक्षक दिनानिमित्त माहिती दिली.यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
शेवटी अध्यक्षीय समारोपात बोलताना मुख्याध्यापक श्री.माबुद कुरैशी सर यांनी शिक्षकदिनाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली व विद्यार्थ्यांनी सदैव आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करून नेहमी त्यांचा आदर केला पाहिजे असे आवाहन केले.
या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक श्री.शैख़ मुस्तफ़ा सर मो. शमसिर पटेल सर मो.युनुस सर, सोहेल खाँन पठान सर श्रीमती नुज़हत अंजुम
मॅडम शैख़ राजेक सर आल्हाज शैख़ अबुज़र सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयातील शिक्षकांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मो. शमसिर पटेल सरांनी केले तर सोहेल खाँन पठान सर यांनी आभार मानले.