शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज सोमवारी (दि.5) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे राज्यातील शिक्षकांशी संवाद साधून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ऑनलाईन प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण संचालक, उप संचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षकाकडून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. संबंधित संवाद बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, उपशिक्षणाधिकारी गणराज यरमाळ यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या संवाद बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, इ. स्पर्धांचे आयोजन करण्या बाबत सूचित केले तसेच व्यक्तिमत्व विकासपर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा संर्वांगीण विकास साधण्याचे आवाहन जिल्ह्यातील शिक्षकांना केला.