शिरुर: शिरुर महावितरणने अकार्यक्षम वीज मिटीर रिडींग एजन्सीवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला दि 17 फेब्रुवारी 2022 रोजी लेखी निवेदन दिले होते.त्यानंतर महावितरणाकडून या संबधी कोणतीही ठोस कारवाई केली गेली नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केडगाव येथील कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांना लेखी निवेदनाद्वारे अकार्यक्षम वीज मिटीर रेंडीग एजन्सीवर कारवाईचा मुहूर्त न मिळल्यास किंवा ठोस कारवाई न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारवाईच्या मुहूर्तासाठी सुप्रसिद्ध दाते पंचाग भेट देण्यात येईल. असा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र विद्युत महामंडळाचे उप- कार्यकारी अभियंता सोमनाथ माने यास कारवाईचा मुहूर्त मिळण्यासाठी सुप्रसिद्ध दाते पचांग भेट देण्यात आले आहे.
तसेच यापुढे कारवाई न झाल्यास केडगाव येथील कार्यकारी अभियंता याच्या कार्यालयात येत्या पितृ पंधरावड्यात महावितरणाचे श्राद्ध घालण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांना पंचाग भेट देण्यासाठी मनसे शिरुर-हवेलीचे तालुकाध्यक्ष तेजस यादव, शिरुर शहराध्यक्ष अविनाश घोगरे, तालुका उपाध्यक्ष रविंद्र गुळादे, शांताई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय काळे, निमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच भरत विधाटे, ग्रा पं सदस्य प्रदीप पवार व मनसैनिक उपस्थित होते.