आष्टी (प्रतिनिधी) आष्टी -पाटोदा-शिरूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळ च्या वतीने जि.प.शाळा नांदा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सामाजिक उपक्रम राबवत या वर्षी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक बाबींवर खर्च न करता शालेय वस्तू खरेदी करून येणाऱ्या पुढच्या भावी आधारस्तंभ ना आपल्या वाढदिवसा-निमित्त एक भेट म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात.खरोखर असे उपक्रम करणं गरजेचं आहे. आले यावेळी उपस्थित मुख्याध्यापक शिंदे सर,सरोदे सर,बन्सी औटे,जगदिश औटे उपसरपंच,सुभाष औटे,युवा नेते संजय औटे,दत्ता औटे,नवनाथ औटे,महेश औटे,काळे मामा,रामहरी औटे,मारूती औटे ग्रा.पं.सदस्य ,यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .तसेच सर्व शिक्षक व नांदा युवा कार्यकर्ते उपस्थित होते.