पालम तालुक्यातील उमरवडी ग्राम पंचायतीच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. या निवडणूकीत एका महिला उमेदवाराने निवडणूक विभागाकडे देण्यात आलेल्या माहितीत इतर ठिकाणी मतदान यादीत नाव असल्याची माहिती लपवून प्रशासनाची दिशाभूल केली, असा आरोप उमरथडी येथील ग्रामस्थांनी पालम तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केला आहे. उमरथडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. रविवार १८ सप्टेंबर रोजी मतदार होणार असून तीन प्रभागांतर्गत सात जागांसाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सरपंच पद हे थेट जनतेतून निवडण्यात येत आहे. उमरथडी येथील सरपंच पद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षीत असून या ठिकाणी संगीता अच्युतराव पाथरकर या महिला उमेदवारानेही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ९७ गंगाखेड विधानसभा मतदार संघातील मतदान यादीत समाविष्ट असलेल्या पालम तालुक्यातीलच घोडा या गावच्या यादी अनुक्रमांक १६८ नुसार संगीता अच्युतराव पाथरकर यांचे नाव घोडा गावच्या मतदार यादीत समाविष्ट आहे. याच महिलेचे नाव उमरथडी गावच्या यादीतील प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुक्रमांक 3 मध्ये आहे याच नावाचा फायदा घेऊन सदरील महिलेने ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवत आहे. १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द झालेल्या मतदार यादीत सदरील उमेदवाराचे नाव समाविष्ट नव्हते. परंतू त्यानंतर उमरवडी येथील सरपंच पदावर डोळा ठेवून या उमेदवाराने स्वतःचे नाव उमरथडी गावच्या मतदार यादीत टाकले. सद्यस्थितीला दोन्ही गावच्या याद्यांमध्ये या उमेदवाराचे नाव असून निवडणूक विभागाच्या कायदे व नियमांचे उल्लंघन समजून उमेदवार संगीता अच्युतराव पाथरकर या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज अवैध घोषीत करावा, अशी तक्रार उमरवडी येथील भागवत रामेश्वर खोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत उमरवडी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे..

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं