सोलापूर - माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील कसबा पेठेत १८ वर्षीय श्रीगणेश भाविकाचा विजेचा शॉक बसून शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जागीच मृत्यू झाला . मोबीन अजीज आत्तार असे मृताचे नाव आहे . टेंभुर्णी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे . मोबीन आत्तार बारवे मळा परिसरात अजिंक्य भवानी गणेश मंडळाने एका दुकानाच्या गाळ्यात गणपतीची स्थापना केली आहे . मंडळाचा कार्यकर्ता मोबीन अजीज आत्तार ( वय १८ रा . कसबा पेठ ) . शनिवारी गणपती बसवलेल्या ठिकाणी शटर उघडण्यासाठी गेला होता . गाळ्यामध्ये समोरील सार्वजनिक पथदिव्यांच्या पोलवरून वीजजोडणी घेण्यात आले आहे . मोबीनने शटर उघडताना त्याला शटरमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहचा जोरात शॉक लागला . त्यामुळे त्याचा जागेवर मृत्यू झाला . मोबीन हा तीन महिन्यांपासून येथील डॉ . राहुल पाटील यांच्याकडे कारचालक म्हणून काम करते होता . शनिवारी त्याने मंगळवेढा येथील नातेवाईक वारले असल्याचे सांगून घरी न जाता तो गणपती कार्यक्रमासाठी थांबला होता. 

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |

मोबिन याच्या मृतदेहाचे टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले . अजीज इस्माईल आतार यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे. मोबिन याच्या पाश्चात आई , वडील एक लहान भाऊ असा परिवार आहे.