लोहगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या...

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

मयताच्या पत्नीच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल...

माझ्यासोबत लग्न कर असा तगादा लावून धरत असलेल्या महिलेविरुद्ध गुन्हा ...

आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले प्रकरणी गुन्हा दाखल...

बिडकिन प्रतिनिधी:-

पैठण तालुक्यातील लोहगाव येथील गणेश सुभाष मुसळे,३० वर्षे,रा.लोहगाव,ता.पैठण या तरुणाने गळफास घेऊन आज सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली होती मात्र आत्महत्या करण्याचे कारण मात्र अस्पष्ट होते.सदरिल मृत्यू झालेल्या तरुणाच्या पत्नीने अंत्यविधी होताच लोहगाव येथील एका महिलेविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,दि.०३ रोजी सायंकाळी ०६वाजेच्या सुमारास मयताची पत्नी भारती गणेश मुसळे,वय.२४ वर्षे,रा.लोहगाव यांनी दिलेली फिर्याद अशी की,आमच्या घराच्या शेजारी राहणारी महिला हि माझे पती गणेश मुसळे सोबत "प्रेमसंबंध ठेवून लग्न कर, तुझ्या पत्नीला सोडुन दे."अशा प्रकारचा समक्ष व फोनवरून तगादा लावून मारण्याच्या धमक्या देत असल्याने माझे पती गणेश यास मानसिक त्रास देत आरोपी महिलेने मयतास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्यामुळे गणेश मुसळे यांनी राहत्या घरात सकाळी ०३:०० वाजता गळफास लावून आत्महत्या केली.याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या महिलेविरुद्ध कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरिल घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनेश जाधव हे करित आहेत..

रविंद्र गायकवाड, बिडकिन