बिडकिन पोलिस ठाण्याचे वतीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा...

झन्नामन्ना व तिरट खेळणारे २३ जणांवर कारवाई...

बिडकिन प्रतिनिधी:-

पैठण तालुक्यातील बिडकिन पोलिस ठाणे हद्दीत काल रात्री उशिरा दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला होता.

पोलिस ठाणे हद्दीतील मुलानी वाडगाव व काळे गल्ली बिडकिन या दोन्ही ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला असुन २३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मौजे मुलानी वाडगाव येथील एका शेतात चिंचेच्या झाडाखाली मोकळ्या जागेत गोल रिंगण करून झन्ना मन्ना नावाचा जुगार अड्ड्यावर छापा टाकून ०७ जणावर कार्यवाही करत एकुण नगदी ३१४० रुपये रोख व ०६ मोटारसायकली व जुगार साहित्य असा एकुण १,३८,१४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन काळे गल्ली बिडकिन येथील सार्वजनिक गणपती जवळ गोल रिंगण करून पत्यावर पैसे लावुन तिरट नावाचा जुगार खेळत असताना १७ जणांवर कारवाई केली असुन रोख रक्कम व दोन मोटारसायकली व जुगार साहित्य असा एकूण १,२४,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हि कार्यवाही सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली व समवेत 

पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलिस उपनिरीक्षक मनेश जाधव, पोलिस नाईक ताराचंद गव्हाणे, पोलिस नाईक माळी, पोलिस कॉन्स्टेबल विष्णू गायकवाड,पोलिस कॉन्स्टेबल निलेश चौधरी,माळे आदींच्या पथकाच्या मार्फत हि कार्यवाही करण्यात आली.

रविंद्र गायकवाड, बिडकिन